Home धर्म-समाज सांगवी प्र.लो. येथील महिलेची हक्काच्या जागेसाठी भटकंती; निवेदनातून उपोषणाचा इशारा

सांगवी प्र.लो. येथील महिलेची हक्काच्या जागेसाठी भटकंती; निवेदनातून उपोषणाचा इशारा

0
28

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी प्र.लो. येथील महिलेला हक्काच्या जागेसाठी भटकंती करावी लागत असल्याने वारंवार संबंधित विभागात जाऊनही न्याय मिळत नाही. यासंदर्भात प्रशासनास निवेदन दिले असून आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

सांगवी प्र. लो. ता. पाचोरा येथील विमलबाई गोबा मांग ही महिला गेल्या २५ ते ३० वर्षांपासून गावातील रहिवाशी असुन गाव नमुना ८ प्रमाणे नं. ११३ बखळ २ हजार ४०० स्वेअर फुट या जागेवर भोगवटा असुन त्याबाबत महिलेकडे ग्राम पंचायत उताऱ्याची नोंद असुन सुद्धा त्या जागेवर काही मंडळींनी अनाधिकृत कब्जा केला असल्याने विमलबाई मांग यांना गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे भटकंती करावी लागत आहे. अनेक वेळा निवेदन देवुन सुद्धा विमलबाई मांग यांना न्याय मिळत नसल्याने अखेर दि. २१ फेब्रुवारी पर्यंत त्यांची मागणी मान्य न झाल्यास दि. २२ फेब्रुवारी रोजी संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन विमलबाई मांग यांनी दि. १४ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी यांना दिले आहे. तसेच निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, पाचोरा, तहसिलदार (पाचोरा), उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक (पाचोरा), सहाय्यक पोलिस निरीक्षक (पिंपळगाव हरेश्र्वर) यांना देण्यात आल्या आहेत.

 


Protected Content

Play sound