अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी आमदार उद्यानपंडित कै . बापूसाहेब .ग . द .माळी गुरुजी स्मृती व्याख्यानमाला समिती धुळे आणि महात्मा फुले विचार मंच धुळे यांच्यावतीने उद्यान पंडित कै बापूसाहेब ग द माळी गुरुजी माजी आमदार यांच्या जयंतीनिमित्ताने खानदेशस्तरीय निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत खुला गटातून संगिता झुलाल चौधरी उपशिक्षिका आदर्श माध्यमिक विद्यालय दोंदे कॉलनी धुळे यांचा खानदेशस्तरीय द्वितीय क्रमांक आला . त्यांना प्रशस्तीपत्र ग्रंथ आणि 750 रुपये रोख बक्षिस बहाल करून गौरविण्यात आले . हे बक्षिस सौ . अनुषा सोनवणे संचालिका महाजन हायस्कुल व जेष्ठशिक्षीका श्रीमती वर्षा भामरे यांच्या शुभहस्ते देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, कार्याध्यक्ष आबासो दिलीप सोनवणे, ॲड. बाळासाहेब सोनवणे, आनंदा महाजन संचालक, प्रविण महाजन संचालक, डॉ . रविंद्र पाटकरी, एस एच जाधव मुख्याध्यापक आदर्श हायस्कुल, माजी मुख्याध्यापिका बाविस्कर मॅडम यांच्यासह महात्मा फुले विचार मंच चे कार्याध्यक्ष प्रा. अण्णा माळी, प्रसिध्दी प्रमुख राहुल महाजन हे उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मोहन सोनवणे, एस . के चौधरी, एस एम पाटील, पतसंस्थेचे चेअरमन अशोक अहिरे चेअरमन, संजय पाटील सह सर्व संचालक मंडळ अ . भा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील, मानद अध्यक्ष ॲड . संभाजीराव पगारे, काशिनाथ माळी, मन्साराम माळी माजी मुख्या नगराज महाजन आदींनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.