साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा बारावी परीक्षेच्या निकालात मुलीची यशस्वी भरारी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सन २०२३ -२४ या वर्षातील फेब्रुवारी मार्च २०२४ च्या बारावीच्या परीक्षेमध्ये पी. एम. श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल १००% टक्के तर कला शाखेचा निकाल ९१.९७% तसेच वाणिज्य शाखेचा ९७.९१% टक्के निकाल लागलेला आहे.

यामध्ये विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी दिनेश पाटील हिने ८९.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक तर सर्वेश किरणकुमार वाणी ८८.१७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी तन्वी मंदार गडे ८६ ,८३% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच वाणिज्य शाखेतून कुमारी अश्विनी सुकलाल ढाके ८५.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर कुमारी गायत्री किशोर पवार हिने ८२.६७% गुण मिळवून द्वितीय तसेच कुमारी जानवी भरत पाटील हिने ७९.१७ % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. कला शाखेतून कुमारी वैष्णवी अर्जुन खलसे ७८.५० % प्रथम क्रमांक, तर कुमारी काजल ज्ञानेश्वर पाटील हिने ७३.५०.% गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कुमारी सपकाळे रोहिणी आनंदा हिने ७२ .१७% तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक एम. के. पाटील सर उपप्राचार्य ए.एस. इंगळे सर पर्यवेक्षक व्ही. ए . काटकर, व्ही. टी. नन्नवरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या यशामध्ये सहकार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा अभिनंदन केले.

Protected Content