अमळनेर (प्रतिनिधी) दिव्यांग असल्या तरी मनाने दिव्यांग नाहीतच.. अशा शिरसाळे जिल्हा परीषदेच्या आदर्श शिक्षिका मनिषा चौधरी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाचे देणे लागतो या उद्देशाने त्यांनी पाच हजार रूपये सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट दिले.
मनीषा चौधरी यांनी दाखविलेल्या दातृत्वबद्दल त्यांचा सत्कार वाचनालयातर्फे करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ, गोविंदा चौधरी ,आशालता चौधरी, बापू नगांवकर होते. यावेळी मान्यवरांनी सांगितले कि, मनीषा चौधरी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असून त्या तन, मन, धनाने समाजाचे ऋण फेडावेत या हेतूने कामासाठी उभ्या आहेत याचा वाचनालयाच्या कार्यकारणीला अभिमान आहे. प्रस्ताविक स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंग पवार यांनी केले. त्यांच्या या कामाला व वाढदिवसानिमित्त सानेगुरुजी ग्रंथालयात शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ईश्वर महाजन, सुमित धाडकर, सोपान भवरे,अविनाश पवार, सानेगुरुजी वाचनालयाचे कर्मचारी व स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी उपस्थित होते.