दिवाळीच्या सुटीत वाळू तस्कर सैराट : कारवाईची मागणी

रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या दिवाळीच्या सुट्या सुरू असल्याने वाळू तस्कर अक्षरश: सैराट झाल्याचे दिसून येत असून त्यांना आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी तालुक्यातून करण्यात येत आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, वाळु वाहतूक करणारे सध्या मोकाट सुटल्याचे दिसून येत आहे. दररोज शेकडो ब्रास वाळू ट्रक्टरद्वारे रावेर शहरात वाहतूक केली जात आहे.केर्‍हाळा पिंप्री येथून येथून हे वाळू उत्खनन करत असतात याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रावेर शहरात तसेच रसलपुर येथे वाळू वाहतूक करणारे अनेक ट्रॅक्टर्स सध्या दिसून येत आहेत. शेकडो ब्रास वाळूची दररोज वाहतुक केली जात आहे.याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.पहाटे दोन तर सकाळी नऊ पर्यंत वाहतूक केली जात आहे.यात सर्वात जास्त वाळू वाहतूक करण्यात महाजन नामक व्यक्ती सर्वात अग्रसर आहे.दररोज सात ते आठ वाळुच्या फेर्‍या मारत असल्याने महसूलसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.

सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने सर्व महसूल अधिकारी बाहेरगावी गेले असल्याची संधी ही वाळु वाहतूक करणारे साधत आहे.आमचे सर्वत्र माणसे असल्याने आपल्यावर कारवाई होऊच शकत नसल्याच्या वल्गना वाळू तस्कर महाजन हा करत आहे. यामुळे हसूल विभागाने त्याच्यासह अन्य तस्करांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Protected Content