वाळूच्या डंपरची कारला धडक

जळगाव (प्रतिनिधी) नशिराबादकडे वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रकने अजिंठा चौफुली जवळ कारला कट मारून फरार झाल्याची घटना आज दुपारी घडलीय. दरम्यान, याबाबत अद्याप एमआयडीसी पोलिसात कुठलीही नोंद झालेली नाही.

 

याबाबत माहिती अशी की, हॉटेल मुरलीमनोहरचे मालक लक्ष्मी नारायण उपाध्याय (रा. गणपती नगर) हे घरून नेहमी प्रमाणे दुपारी साडे बारा वाजेच्या सुमरास हॉटेलवर कार क्र. (एमएच 19 सीयू 7069) जे जात होते. त्याच वेळेस जळगावकडून नशिराबादकडे जाणारा डंपर क्र. (एमएच 19 झेड 5700) ने कारला कट मारला. यामध्ये कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर ट्रकचे मालक गोपाळ ठाकूर यांनी डंपरचा चालक नशिराबादच्या दिशेने फरार झाल्याचे सांगितले. याबाबत एमआयडीसी पोलिसात अद्यापपर्यंत कुठलीही नोंद झालेली नाही.

Add Comment

Protected Content