धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळी वाडा स्मशानभूमी जवळून चोरटी वाहतूक करतांना आज सकाळी महसूल विभागाच्या पथकाने वाळू व मुरूमचे ट्रॅक्टर पकडले आहे. या कारवाईमुळे गौणखनिज माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, यातील एक ट्रॅक्टर गावातील एका नगरसेवकाचे तर दुसरे नारणे गावातील व्यक्तीचे असल्याचे कळते.
या संदर्भात अधिक असे की,धरणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गौणखनिजाची चोरटी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे धरणगाव तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेले तहसीलदार मिलिंद कुलते यांनी कारवाई करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पाचही सर्कल यांचे एक पथक तयार करण्यात आले. आज सकाळी साडे दहा वाजेच्य सुमारास मोठा माळीवाडा पुढील स्मशानभूमी जवळून ट्रॅक्टर क्र.(एमएच १० एस २३५५) व अन्य विना नंबरचे दुसरे ट्रॅक्टर अनुक्रमे मुरूम,वाळूची चोरटी वाहतूक करत होते. ही दोघं ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे. महसूल कर्मचारी दीपक शिरसाठ यांनी या ट्रॅक्टरर्सचा पंचनामा केला आहे. ट्रॅक्टर मालकांचा शोध घेतला जात असून नियमाप्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल केला जात असल्याचे कळते. दरम्यान, या घटनेमुळे माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तर संबंधित ट्रॅक्टर नगरसेवकाने आपले नाव उघड व्हयला नको, म्हणून फिल्डिंग लावायला सुरुवात केली असल्याचे कळते.