बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील ग्रामीण मार्ग व रस्त्याच्या कामाला पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ७ कोटी २० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्न केल्याने निधी मंजूर करण्यात आला आहे.
बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडयांपाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरण करण्यासाठी ७ कोटी २० लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. यात मनूर बुद्रुक ते शेलवड रस्त्यासाठी ९० लाख , मनुर बुद्रुक ते लोणवाडी रस्त्यासाठी ९० लाख, मनुर खुर्द ते राऊत झिरा साठी ९० लाख , धानोरी ते पिंपळबाव खुर्द साठी ९० लाखा आणि करंजी ते जनोने च्या रस्त्यासाठी ९० लाख, सुरवाडे खुर्द ते बोरगाव ९० लाख, घाणखेडा ते तालुका हद्द पिंपळखुटा साठी न९० लाख आणि मानमोडी ते ९० लाख असे एकुण ७ कोटी २० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.