भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिचर्डे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत जागेसाठी नावे लावण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने समता सैनिक दलातर्फे निवेदन देण्यात आले आहे.
मौजे पिचर्डे ता. भडगाव जि.जळगाव येथील समाज ओटा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी नियोजित जागा) नावे त्वरीत लावण्यासाठी टाळाटाळ होत आसल्याचे कळताच समता सैनिक दलाचे तालुका प्रचारक विजय मोरे यांनी सदर घटनेची माहिती घेवून जल्हा प्रचारक स.सै.दल किशोर डोंगरे यांचे मार्गदर्शन घेऊन निवेदन दिले. त्याच्या सोबत समता सैनिक दलाचे वाल्मीक मोरे, सागर मोरे,राकेश मोरे आदि उपस्थित होते.
मौजे पिचर्डे येथील भिमसैनिक ग्रुप मार्फत संघटनेस मिळालेल्या लेखी निवेदनानुसार बौध्द वस्तीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी नावे लावण्याबाबत विनंती अर्ज ग्राम पंचायत पिचर्डे यांच्याकडे दिले होते. त्यानुसार मासिक सभा दि. ३१/०३/२०२३ अन्वये सदर जागा नावे लावण्याबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती भडगाव यांच्याकडे योग्य त्या मार्गदर्शनासाठी पत्र व्यवहार करणे बाबत ठराव संमत झाला आहे.
त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत पिचर्डे यांनी आपल्या कार्यालयाकडे सदर प्रकरणांसदर्भात मार्गदर्शन दि. ०३/०४/२०२३ रोजी पत्र व्यवहार करून मागितले आहे. परंतु संघटनेच्या माध्यमातून या प्रकरणा संदर्भात संबंधित ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता आज पावेतो आपल्या कार्यालयामार्फत कोणतीही मार्गदर्शक सुचना मिळालेल्या नाही सदर प्रकरणांस आज सहा महिने उलटले असून आज पर्यंत कुठलीही हालचाल झालेली नाही.
या अनुषंगाने समता सैनिक संघटनेच्या माध्यमातून देशभर महाराष्ट्र राज्यभर २६ नोव्हेंबर रोजी संविधान जागरण दिवस म्हणून साजरा करणार आहोत. नियोजित जागेवर संघटनेच्या माध्यमातून संविधान जागरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. आपण सदर प्रकरणाच गांभिर्यपूर्वक दखल घेऊन सदर जागा नमूना क्रमांक ०८ मध्ये नोंदवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ही नियोजित जागा (समाज ओटा) लावावी अशी मागणी या निवेदनात देण्यात आली आहे.
जर १५ दिवसांच्या आत सदर स्मारकाची जागे संदर्भाची कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या माध्यमातून र् निषेध नोंदविण्यात येईअसा इशारा वाल्मीक मोरे यांनी दिला आहे.