Home Cities पाचोरा अनिल सावंत यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर

अनिल सावंत यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र फाउंडेशन पुणे या संस्थेकडून राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार पाचोरा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत यांना जाहीर झाला असून सदरचा पुरस्कार हा मान्यवरांच्या हस्ते पुणे येथील आळंदीला देण्यात येणार आहे.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत हे गेले अनेक दशकापासून चर्मकार समाजात उल्लेखनीय कार्य करत आहेत. ते आज विविध संघटनेत देखील काम करत असून त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, तसेच पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजेच एक मानाचा तुरा समाजात रोवला गेला असून ते आज विविध क्षेत्रातील सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मालन वसतिगृह पाचोरा येथे अधीक्षकपदावर तसेच सहकार क्षेत्रात संचालक म्हणून पाचोरा येथील दादासाहेब गजमल को-ऑप बँकेत अनेक वर्षे होते व पत्रकारितामध्ये अनेक वृत्तपत्रां मध्ये त्यांनी काम करून आजमितीला स्वतः झटपट लाईव्ह न्यूज च्या माध्यमातून संपादक म्हणून काम पाहतात. ते पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, व सहकार क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound