जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री संत जगनाडे महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त समाजबांधवातर्फे शनिवारी दि. २८ डिसेंबर रोजी अभिवादन करण्यात आले. संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील तुळजाई नगरातील कालिका माता मंदिर जवळ समाज बांधव एकत्र झाले होते.
प्रसंगी जगनाडे महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. यानंतर संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून समाज बांधवांनी अभिवादन केले. या प्रसंगी अमोल चौधरी, प्रशांत सुरळकर, विशाल पाटील, सागर चौधरी, योगराज चौधरी, विनोद चौधरी, गजानन पाटील, दीपक चौधरी, रामचंद्र चौधरी, प्रितेश चौधरी, प्रदीप चौधरी, शिक्षक अमोल चौधरी आदी उपस्थित होते.