धरणगाव (प्रतिनिधी) येथे गेल्या पंधरा वर्षापासून फुले-आंबेडकर जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे. या सर्वपक्षीय समितीतर्फे विविध सामाजिक,प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नुकतीच यावर्षी या समितीची बैठक झाली. त्यात अध्यक्षपदी विद्यमान नगराध्यक्ष सलीम पटेल, कार्याध्यक्षपदी गुलाबराव वाघ, उपाध्यक्षपदी शिरीष बयस ,सचिवपदी डॉ.संजीवकुमार सोनवणे, खजिनदारपदी भानुदास विसावे तर निमञंकपदी दिपक वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
येथील नगरपालीकेच्या अध्यक्ष कक्षात फुले-आंबेडकर सर्वपक्षीय उत्सव समितीची बैठक कार्याध्यक्ष गुलाबराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. खर्चाची तरतूद करण्यात आली. याप्रसंगी उत्सव समितीचे डी.जी.पाटील, वासुदेव चौधरी ,संजय महाजन,शरदकुमार बन्सी,राजेंद्र महाजन ,डॉ.लिलाधर बोरसे ,भरतकुमार चौधरी , ,रविद्र महाजन, डी.एस.पाटील, कडू महाजन ,धर्मराज मोरे, राजेंद्र महाजन, हेंमत चौधरी, राजेंद्र न्हायदे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी समितीच्या सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. त्यात प्रा.आर.एन.महाजन, डी.जी.पाटील, सुरेश चौधरी, प्रा.बी.एन.चौधरी यांचा समावेश आहे. आभार निमञंक दिपक वाघमारे यांनी मानले.