भुसावळ विधानसभा मतदार संघासाठी पहिल्या दिवशी २८ अर्जांची विक्री

vidhansabha5

भुसावळ, प्रतिनिधी |  विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षांच्या हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे. अर्ज (नामनिर्देशन ) विक्रिस सुरुवात झाली असली तरी अजूनही विविध राजकीय पक्षांचे उमेदवार नक्की झालेले नाही तरीही संभ्रमावस्था असूनही अनेकांनी आज अर्ज घेतले आहे. .आज शुक्रवार दिनांक २७ रोजी भुसावळ विधानसभा मतदार संघासाठी आज शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत तब्बल २८ नामनिर्देशपत्र विक्री झाली आहे.

अर्ज २८ अर्ज घेणाऱ्यांमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस,  वंचित बहुजन आघाडी, रिपाई  व अपक्ष यांचा समावेश आहे. पक्षनिहाय अर्ज घेतेले उमेदवार : डॉ. मधु राजेश मानवतकर (अपक्ष ), व लक्ष्मण कौतिक सोयंके (भाजप ), निलेश अमृत सुरडकर (शिवसेना ), राहुल शामराव इंगळे (अपक्ष ), अरुण चंद्रभान तायडे (अपक्ष ), संजय लक्ष्मण वानखेड़े (रिपाई सोशल ), दिलीप पंढरी सुरवाडे (अपक्ष ), कैलास गोपाळ डूबे ( इंडियन मुस्लिम इं. लीग, ), प्रशांत सुकदेव निकम प्रतीनिधि (भाजप ), प्रवीण नाना सुरवाडे (अपक्ष ), प्रवीण गौतम मेघे, (अपक्ष ), रविंद्र लक्ष्मण सपकाळे,( वंचित बहुजन आघाडी ), सोनल रविन्द्र सपकाळे,(वंचित बहुजन आघाडी ), महेंद्र बळीराम सपकाळे,( वंचित बहुजन आघाडी ), गीता प्रशांत खाचणे,(शिवसेना ), ऍड. कृष्णा डिगबर तायडे,( अपक्ष ), सतीश भीका घुले (राष्ट्रवादी ), राजेश रमेश इंगळे (अपक्ष ), छोटेलाल पतिराम घुले (अपक्ष ), पुरुषोत्तम मधुकर सुरळकर (रिपाई ), विजय भास्कर सुरवाड़े (शिवसेना ), फरीदा अंजूम गुलाम मोहम्मद (कॉंग्रेस ), जानकिरा प्रमोद सपकाळे(अपक्ष ), अशोक चूडामन ठोसर (अपक्ष ). नीलेश राजू देवघाटोले(शिवसेना), प्रभाकर सुभाष जाधव (भाजप ), डॉ. महेंद्र नारायण शेजवळकर (अपक्ष), डॉ. मधु राजेश मानवतकर (भाजप ) असे .एकूण २८ अर्ज विक्री झाली आहेत.

Protected Content