चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दारूच्या धुंदीत असणार्या मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील अभोणे येथे घडली आहे.
सर्व जण पोळा साजरा करत असतांना चाळीसगाव तालुक्यात अभोणे येथे धक्कादायक घटना घडली आहे. अभोणे येथील पिंटू तुकाराम पाटील व त्याचा लहान भाऊ शिवाजी तुकाराम पाटील यांनी पोळ्याची पूजा सुरू केली. ते दोन्ही भाऊ दारूच्या नशेत असल्याने त्यांच्या पहिल्यांदा शाब्दीक वाद झाले. यातून दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. यात पिंटूने आपल्या भावाच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केल्याने तो जागीच मरण पावला.
भर गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यात दारूच्या नशेत असणार्या पिंटू तुकाराम पाटील ( वय ३८) याने आपल्या भावाचा खून केल्याने त्याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.