भुसावळ, प्रतिनिधी | अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ भोरगाव, लेवा पाटीदार पंचायत विभाग भुसावळ व लेवा पाटीदार मित्र मंडळ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुक युवक-युवती परिचय संमेलन रविवार ६ ऑक्टोबर रोजी संतोषी माता हॉल भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या परिचय संमेलनानिमित्ताने युवक-युवतींची संपूर्ण कौटुंबिक माहिती असलेले परिचय पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. या परिचय सूचीसाठी नाव नोंदणी केंद्रांवर सुरू आहे. नोंदणी केंद्र पुढील प्रमाणे कल्पना रसवंती शिवाजी कॉम्प्लेक्स, पुरुषोत्तम मेडिकल जामनेर रोड, जंगले अँड सन्स, मामा पान सेंटर जामनेर रोड येथे नोंदणी करता येणार आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख २५ सप्टेंबर असून इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नावे नोंदवावीत असे आवाहन शहराध्यक्ष देवा वाणी व भोरगाव सचिव डॉ. बाळू पाटील यांनी केले आहे.