शहरात संत सावता माळी पुण्यतिथी निमित्ताने शोभायात्रा (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 07 31 at 12.10.22 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरात विविध भागामध्ये संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात अयोध्या नगर परिसरात तसेच तुळजा माता परिसत संत सावता माळी यांच्या पुण्यतीथीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

तुळजा माता नगरात जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन यांच्याहस्ते पालखी पूजन

क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ व क्षत्रिय माळी समाज नवयुवक मंडळ यांच्यातर्फे विविध कार्यक्रम घेऊन संत शिरोमणी संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य   नानाभाऊ महाजन यांच्या हस्ते श्री संत सावता महाराज यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. तुळजा माता नगर येथील काशिनाथ धोंडू महाजन यांच्या राहत्या घरापासून दिंडी काढण्यात आली. या दिंडीत स्वामी समर्थ चौक इंद्रप्रस्थ सभागृहापर्यंत वाजत गाजत सावता महाराजांचे अभंग गात भजनी मंडळ सहभागी झाले होते. मिरवणूकीदरम्यान मोफत वृक्षांचे वाटप करण्यात आले. इंद्रप्रस्थ सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोद्दार स्कूलचे प्राचार्य गोकुळ मन्साराम महाजन हे होते. यावेळी श्री संत सावता माळी युवक संघाची स्थापना करण्यात आली. आपले कर्तव्य व कर्म प्रमाणिकपणे करीत राहणे म्हणजे खरी ईश्वर सेवा हा संत सेवा संत सावता माळी यांनी दिलेला संदेश मान्यवरांनी मनोगतात व्यक्त केला. श्री संत सावता माळी यांना आरती द्वारे अभिवादन करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसाद दशरथ लक्ष्‍मण चौधरी यांनी दिला. सूत्रसंचालन राकेश चिंधु महाजन यांनी केले. यशस्वीतेसाठी सचिव प्रमोद कौतिक माळी, नवयुवक मंडळ अध्यक्ष रमेश जिजाबराव चव्हाण, महिला मंडळ अध्यक्ष शशिकला प्रभाकर महाजन, भुषण माळी, रवींद्र महाजन, वसंत महाजन अशोक महाजन अतुल महाजन भिकन महाजन सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघ यांनी कामकाज पाहिले कार्यक्रमाला देविदास महाजन रतन महाजन भूषण मगरे काशिनाथ महाजन पंकज महाजन विमलबाई महाजन संगीताबाई महाजन काशिनाथ महाजन कल्पना महाजन यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

अयोध्या नगरात महापौर सिमा भोळे यांच्याहस्ते पूजन 

शहरातील अयोध्या नगर परिसरात संत सावता माळी यांच्या पुण्यतीथीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महात्मा फुले बहुउद्देशीय विकास संस्था माळी समाज अयोध्यानगर तर्फे सकाळी ९ वाजता संत सावता माळी यांच्या पालखीचे माजी नगरसेवक सुनील माळी यांच्या हस्ते पूजन झाले. यानंतर शोभायात्रेला अयोध्या नगरातील संतोष इंगळे यांच्या घरापासून प्रारंभ झाला. शोभायात्रेत भजन, अभंग म्हणत वाजत गाजत समाजबांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. लहान मुले, महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अयोध्या नगर, सदगुरु नगर, राममंदिर मार्गे शोभायात्रेचा समारोप कासार मंगल कार्यालयात झाला.यावेळी समाजातील ३० दहावी, बारावी तसेच पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.प्रसंगी मंचावर महापौर सीमा भोळे, संस्था अध्यक्ष नंदू पाटील, वसंत पाटील, वसंत महाजन उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर सीमा भोळे यांनी, संतांचे कार्य प्रेरणा देणारे असून त्यापासून शिकले पाहिजे. साक्षात भगवंत ज्यांना भेटले असे संत सावता माळी होते, असे सांगत त्यांनी संत सावता माळी यांच्याविषयीचा अभंग म्हणून दाखवला. नंदू पाटील, वसंत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कृष्णा माळी तर आभार उपाध्यक्ष प्रशांत महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष इंगळे, हर्षल इंगळे, रामचंद्र थोरात, हेमंत महाजन, दिलीप बागुल, अनिल, थोरात, अक्षय जेजुरकर, बापू माळी, भूषण महाजन, वामन महाजन, कल्पना माळी, सुनिता माळी, हिरकणी पाटील, वंदना इंगळे, सुभाष माळी आदींनी परिश्रम घेतले.

हभप भागवत महाराज
कार्यक्रमात हभप भागवत महाराज यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान झाले. ‘कर्मे ईश्वर भजावा’ हा महत्वाचा सिद्धांत संत सावता माळी यांनी दिला. आपले कर्म हीच ईश्वरपूजा असून कामाला पूजा मानली तर देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. संतांच्या मांदियाळीत सर्वात वयस्कर संत असल्याने संत सावता माळी यांना संत शिरोमणी म्हणून ओळखले जाते, असेही ते म्हणाले.

 

 

Protected Content