
अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रतिपंढरपुर म्हणून नावारुपाला आलेले, भाविकांचे श्रध्दास्थान संत सखाराम महाराजांच्या जयघोषात रथोत्सव उत्साहात पार पडला. यावर्षी रथाला मोगरी लावण्याचा मान मुस्लिम समाजाला देण्यात आला.
वैशाख शु.मोहीनी एकादशीला रथाची मिरवणूक निघते. रात्री रथ प्रसाद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मार्गस्थ झाला. मिरवणुकीत निघालेला रथाला दहा तासात तो पोहचला.सागाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेल्या रथाची विधीवत पुजा करण्यात आली. रथाच्या पुढे पंरपरेने मनु महाराज बेलापुरकर यांची दिंडी मिरवणुकीत सहभागी झाली होती. ब्राह्मण महीला ढोल ताशांच्या वादयाच्या गजरात रथोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवाला दोनशे वर्षांची परंपरा आहे. नुकताच काही दिवसापूर्वी शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संत सखाराम महाराजांचा रथ अतिशय उंच असून तो सागाच्या लाकडापासून बनवलेली आहे. वाडी संस्थांची दुसरी गादी पुरुष गोविंद महाराज यांनी 1819 मध्ये रथ उत्सवाची परंपरा सुरू केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देवतांचे व्रत निघत असतात. मात्र, बहुतांश रथ सकाळीच निघत असतात. परंतु अमळनेर मधील संत सखाराम महाराजांचा रथ हा सायंकाळी मुहूर्त बघूनच काढण्यात येत असतो. वाडी संस्थानातून निघालेला हरत सराफ बाजार दगडी दरवाजा फरशी पूल पहिला मार्ग वाडीमध्ये पोहोचतो. संध्याकाळी आठ वाजता निघालेला हा रथ सकाळी पोहोचतो. रथाच्या वेळी फटाक्यांची आतीषबाजी होते. लहाणापासुन ते अबाल वृद्धांपर्यंत या रथोत्सव मध्ये सहभागी होतात. ग्रामीण भागातील अनेक महीला व पुरूष रथ पाहण्यासाठी येतात.
या रथ उत्साहात आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ,माजी आमदार साहेबराव पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ,जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी सिमा आहिरे, तहसीलदार ज्योती देवरे,मुख्याधिकारी शोभा बाविस्कर,विक्रांत पाटील, नगरसेवक प्रविण पाठक,सुनील भामरे,डॉ अनिल शिंदे,उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे,व अनेक मान्यवर उपस्थित होते.