सह्याद्री प्रतिष्ठानचे शिलेदार शिवरथ यात्रेला रवाना

0
79



चाळीसगाव प्रतिनिधी । सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित शिवरथ यात्रा साठी चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार पुष्पहार अर्पण करून चाळीसगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी शुभेच्छा देण्यासाठी चाळीसगावचे माजी उपनगराध्यक्ष आबासाहेब रमेश चव्हाण, शिवसेनेचे चाळीसगाव तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, जळगाव ग्रामीण राजू पाटील, जळगाव शहरचे संजय पाटील, नगरपालिकेच्या उपाध्यक्ष सौ आशाताई चव्हाण, युगंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ स्मिताताई बच्छाव, महिला आयोगाच्या सदस्य सौ देवयानी ठाकरे, उमंग समाज शिल्पीच्या अध्यक्षा सौ संपदाताई पाटील, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बापू शिरसाठ, सौ आशाताई शिरसाठ, सौ छाया पाटील ,सौ अरुणा घोरपडे, सौ सुरेखा गुंजाळ, सौ भारती गुंजाळ, सौ सुरेखा पाटील, प्राजक्ता घोरपडे, नगरसेवक नानाभाऊ कुमावत, नगरसेवक मानसिंग राजपूत, प्रदीप राजपूत, अजय जोशी, निलेश गायके ,निलेश गुंजाळ, किरण घोरपडे, गोपाल परदेशी, अनिल कुडे, सुनील गायकवाड, अविनाश काकडे, पांडुरंग बोराडे, प्रताप देशमुख, अनिल गोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवरथ यात्रेच्या माध्यमातून सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रातील तमाम गडकिल्ल्यांच्या संवर्धन कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम गेल्या नऊ वर्षांपासून करीत आहे. किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड असा हा या यात्रेचा प्रवास असून या दरम्यान शिवव्याख्याने मर्दानी खेळ शाहिरी पोवाडे या माध्यमातून जनजागृती करून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ मासाहेब यांचे विचार आणि आचार शिवप्रेमींपर्यंत पोहोचण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान च्या मार्फत केले जाते. या यात्रेसाठी सह्याद्री प्रतिष्ठान चे महाराष्ट्रातील तमाम शिलेदार सामील होत असून जगातील पहिला मानाचा पालखी सोहळा म्हणून याकडे पाहिले जाते. चाळीसगाव शहरातून या यात्रेस प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे, शरद पाटील, विनोद शिंपी, डॉक्टर दत्ता भदाणे, अनिल शिरसाठ, रवींद्र दुशिंग, दिनेश घोरपडे, प्रशांत जाधव हेमंत भोईटे, सचिन घोरपडे, सचिन देवरे, किशोर राजपूत, विकास राठोड, शुभम शिंदे, चंदू दौंड, सागर जाधव, गणेश सोनवणे, यश चिंचोले, जय राजपूत आदी कार्यकर्ते रवाना झाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here