चाळीसगाव प्रतिनिधी । येथील सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आज दि. 6 सप्टेंबर रोजी गड-किल्ले भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करत असून गड किल्ले संवर्धन चळवळ महाराष्ट्रभर प्रतिष्ठानने मोठ्या प्रमाणावर सुरू केले असून हे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि अनेक मावळ्यांच्या त्यागाचे बलिदानाचे प्रतीक आहे. समस्त शिवप्रेमींसाठी हे गड किल्ले पवित्र स्मारके आहेत. हे गडकिल्ले महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने वारसा हा हॉटेल व्यवसाय व लग्नसमारंभासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय अत्यंत चुकीचा व इतिहास पुसण्यासारखा आहे. गड किल्ले भाडेतत्त्वावर देऊन याठिकाणी हेरिटेजच्या नावाखाली हॉटेल व इतर व्यवसाय सुरू करून या गडकिल्ल्यांचे पवित्र भंग करण्याचे काम होणार आहे. हे सह्याद्री प्रतिष्ठान कदापिही सहन करणार नाही. कारण हे गड किल्ले आमची अस्मिता आहेत. पुढच्या पिढीसाठी आदर्शवत असे स्मारके आहेत. यांचे पावित्र्य जपले गेले पाहिजे म्हणून शासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा असून या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत आहेत.
यांची होती उपस्थिती
चाळीसगाव येथील या निषेधावेळी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप घोरपडे, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्रसह संपूर्ण प्रमूख शरद पाटील, निलेश हमलाई, अजय जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, प्रमोद पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, भैय्या पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे शिलेदार जितेंद्र वाघ, दिनेश घोरपडे, रवींद्र सूर्यवंशी, हेमंत भोईटे, दीपक राजपूत, हर्षवर्धन साळुंखे, विजय पाटील, सचिन पाटील, अरुण आजबे, सुरेश पाटील, रवींद्र दुशिंग, पिंटू आजबे, संजय पवार, पप्पू पाटील, सचिन घोरपडे, लोकेश राजपूत, आकाश चव्हाण, भैय्यासाहेब खैरनार, नंदू पवार, संदीप जाधव, संभाजी सेनेचे सुनील पाटील, ज्ञानेश्वर पगारे, दिवाकर महाले, अमोल पाटील, संदीप जाधव, अविनाश काकडे, रवी जाधव यांच्यासह आदी उपस्थितीत होते.