फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सहकार महर्षी कै. जे.टी. दादा महाजन यांच्या जीवनावरील ‘निष्काम कर्मयोगी’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या दिनांक 24 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
माजी मंत्री तथा सहकाराचे प्रणेते जिवराम तुकाराम महाजन अर्थात जे.टी. दादा महाजन यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे. याचे औचित्य साधून डॉ. एल. झेड. पाटील यांनी लिहलेल्या ‘निष्काम कर्मयोगी’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि सोबत इंग्रजी व सेमी इंग्लीश माध्यमाच्या शाळांचे उदघाटन अशा कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक २४ रोजी सकाळी करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम दादासाहेब जे. टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या स्व. डिगंबरशेठ नारखेडे सभागृहात आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात इमारतींचे उदघाटन व पुस्तकाचे प्रकाशन हे केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे यांच्याहस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. उल्हासदादा पाटील हे राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. शिरीषदादा चौधरी, आ. राजूमामा भोळे, माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, भाजप लोकसभा प्रमुख नंदकिशोर महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे, माजी आमदार रमेशदादा चौधरी, माजी आमदार अरूणदादा पाटील, भागवतभाऊ पाटील, नरेंद्रभाऊ नारखेडे, बाजार समिती सभापती हर्षलभाऊ पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष शरदभाऊ महाजन, उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, उपाध्यक्ष मार्तंड भिरूड, सचिव विजय झोपे, सहसचिव सोनू भंगाळे यांच्यासह संचालक मंडळ, महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.