यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील बामणोद येथील सागर सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी संघटनात्मक बैठकीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, माजी पालकमंत्री सतीश पाटील, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, रोहिणी खडसे खेवलकर, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, यावल तालुकाध्यक्ष नगरसेवक प्रा.मुकेश येवेले, महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा निळ, युवक तालुकाध्यक्ष देवकांत पाटील, यावल नगरपालिकेचे गटनेता अतुल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ आदींची उपस्थिती होती.