यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एसटी बसचा प्रवास सर्वात सुरक्षीत असुन ईतर खाजगी वाहनांच्या तुलनेत एसटीतील वाहनांच्या अपघाताची संख्या कमी आहे : अतुल पाटील
आपल्या एसटी बसचा प्रवास हा सुरक्षीत असून इतर खाजगी वाहनांच्या तुलनेत होणाऱ्या अपघातात एसटी बसगाडयांच्या होणाऱ्या अपघाताची संख्या ही फारच कमी असून अपघातास केवळ वाहनचालकच कारणीभूत आहे असे नसते तर अपघात टाळण्यासाठी सर्वप्रथम आपल्या परिसरातील रस्ते चांगले असणे अत्यंत गरजे असून याशिवाय वाहन चालवित असतांना समोरील येणारे वाहन हे योग्य दिशेने येणे देखील महत्वाचे आहे अशी अनेक कारणे ही अपघातास कारणीभूत असतात, त्यासाठी सर्व वाहन चालकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे असे मार्गदर्शनपर माहिती माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली.
यावल एसटी महामंडळाच्या यावल आगाराच्या वतीने परिसरातील सभागृहात आयोजीत सुरक्षित अभियान पंधरवाडयाच्या निमित्ताने एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन संजय गांधी निराधार समितीचे नायब तहसीलदार मनोज खारे, प्रजापती ईश्वरीय बह्यमचारी विद्यालयाच्या जयश्री दिदी यांच्यासह यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन आदी मान्यंवराच्या उपस्थित संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तर अतुल पाटील यांच्या हस्ते फित कापुन सुरक्षित अभियानाचे शुभारंभ करण्यात आले, या प्रसंगी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन, जयश्री दिदी यांनी उपस्थित एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिता विषयी मार्गदर्शन केले कार्यकमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार त्किशोर मंदवाडे यांनी मांडले .