साध्वी प्रज्ञांना उमेदवारी, भाजपकडून झालेली मोठी चूक : रामदास आठवले

thakur athawale

 

भोपाळ (वृत्तसंस्था) भोपाळमधून साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी देणे ही भाजपकडून झालेली मोठी चूक आहे. यामुळे भाजपला याचा फटका बसू शकतो, असा धोका रिपाईचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

यावेळी आठवले म्हणाले म्हटले की, मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा यांचे नाव होते आणि तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे या प्रकरणात सबळ पुरावे होते. दहशतवाद्यांशी लढताना करकरे शहीद झाले. त्यामुळे एका शहीद अधिकाऱ्याविषयी अशी भाषा वापरणे चुकीचे आहे. करकरे यांच्यासंदर्भात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिलेल्या विधानाशी मी सहमत नाही. मी त्या विधानाचा निषेध करतो. परंतु साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी देणे भाजपची वैयक्तिक बाब आहे. मात्र, साध्वींच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे भाजपने साध्वी प्रज्ञा यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल, असा इशाराही यावेळी आठवले यांनी दिला.

Add Comment

Protected Content