भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह देणार दिग्विजय सिंह यांना आव्हान

digvijay singh

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपामध्ये सामील झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त आहे.

 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. यानंतर भोपाळमधील भाजपा कार्यालयात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी भाजपा नेता प्रभात झा आणि रामलाल सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, भाजपामध्ये सामील झाल्यानंतर भोपाळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. तसेच, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे.

भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी ७.१४ लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी ३.४३ लाख मते मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. भाजपाकडून अद्याप या मतदारसंघासाठी कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

Add Comment

Protected Content