साधनाताई महाजन थेट नुकसानग्रस्तांच्या बांधावर !

जामनेर प्रतिनिधी | तालुक्यात काल रात्री चक्रीवादळासह मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे तालुक्यात मोठी हानी झाली असून नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन आज पहाटेपासूनच नुकसानग्रस्तांशी थेट बांधावर जाऊन संवाद साधत आहेत.

याबाबत वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील अनेक गावांना वादळी पावसाने अक्षरश: झोडपले. यात प्रामुख्याने ओझर, भागदरे, तळेगाव, टाकळी आणि तोंडापूर या गावांमध्ये हाहाकार उडाला असून मोठी हानी झाली आहे. वादळामुळे अनेक घरांची पत्रे उडाले असून रस्त्यांसह शेती शिवार पाण्याखाले गेले आहे.

दरम्यान, आ. गिरीशभाऊ महाजन हे बाहेरगावी असल्याने आज पहाटेपासूनच सौ. साधनाताई महाजन यांनी नुकसानग्रस्तांची पाहणी सुरू केली आहे. त्यांनी वादळी पावसामुळे घराची पत्रे उडालेल्यांची भेट घेऊन त्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. तसेच त्यांनी शिवारात झालेल्या हानीची देखील पाहणी करून पंचनामा करून मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले.

 

Protected Content