Home धर्म-समाज सदभावना पदयात्रेचे भुसावळात स्वागत

सदभावना पदयात्रेचे भुसावळात स्वागत

0
29

भुसावळ प्रतिनिधी । लेह-लडाखपासून निघालेल्या सदभावना पदयात्रेचे भुसावळ शहरात स्वागत करण्यात आले.

तब्बल११ हजार किलोमीटर पार कडून सदभावना पदयात्रा भुसावळात दाखल झाली. सुराणा साधना भवनात नाना पाटील, गौतम चोरडिया, अभिलाष नागला, पंडित रवी शर्मा, रोहित महाले यांनी या पदयात्रेचे स्वागत केले. प्रारंभी गोमातेच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी सेवा प्रकाशन मुस्लीम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक मो.फौजखान यांचा सत्कार सोनू मांडे यांनी केला. तसेच जैन सोशल ग्रुप व भगवान महावीर नवयुवक मंडळातर्फे प्रशांत कोटेचा व गौतम चोरडिया यांनीही त्यांचा गौरव केला. याप्रसंगी डॉ. भरत महाजन, रोहित महाले, पियूष भाई, रघुनाथ सोनवणे, डॉ. डी.एस. पाटील, कमलेश निकम, कृष्णा साळी, अभिलाष नागला, नमा शर्मा आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound