अमळनेर (प्रतिनिधी) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी, येथील व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी गौरव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील यांच्या, सूचनेनुसार तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्याहस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार रुजविण्यासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन समस्यांना वाचा फोडण्यासाठी पक्षाचे विचार पोहोचून पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर देण्यात आली आहे. यावेळी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष राहुल गोत्राळ, विद्यार्थी शहराध्यक्ष सुनील शिंपी, उमेश सोनार, सनी गायकवाड, तेजस वानखेडे, आर्यन मोरे सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.