अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत अमळनेर तालुका अध्यक्ष पदावर समाधान एकनाथ मैराळे यांची निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून नियुक्तीपत्र प्रदान समारंभात खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, खान्देश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. विजय गाडे यांच्या हस्ते समाधान मैराळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडी बद्दल समाधान मैराळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान निवड झाल्यानंतर तालुकाध्यक्ष समाधान मैराळे यांनी तालुका कार्यकारणी जाहीर केली असून सचिव पदी सुरेश कांबळे, कार्याध्यक्ष पदी दिनेश पालवे, उपाध्यक्ष पदी प्रवीण बैसाणे, नूर खान पठाण, खजिनदार हितेंद्र बडगुजर, संघटक आत्माराम अहिरे, प्रसिद्धीप्रमुख योगेश पाने, कार्यकारणी सदस्य काशिनाथ चौधरी, सत्तार खान, यदुविर पाटील, सोपान भवरे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारणीवर विविध स्तरातून अभिनंदन करण्यात आले.