यावल ( प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तिने एस.टी. बसव्दारे प्रवास केलेला असुन, एसटी बस ही आपल्या प्रत्येक यशाची सोबती आहे, असे मनोगत फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी व्यक्त केले.
एसटी बसने प्रवासात आपल्याला सोबती सर्व समाजातील नागरिक प्रवास करीत असतात, याच एसटी बसने प्रवास करीत असतांना आपल्याला नवे मित्र मिळतात, आपल्या सार्वजनिक व्यवस्थेत एस. टी. बसने प्रवास करणे. हे गरजेचे नसुन तर आपले कर्तव्य आहे. सार्वजनीक प्रणालीच्या एस. टी. बसव्दारे प्रवास करतांना हमी असते, नुकत्याच संपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील आपल्या एस. टी. बसने अतिशय महत्वाची भूमिका बजावली व नेहमीच बजावत असते. राज्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी आपल्या शैक्षणिक कार्यासाठी अल्पदरात सुखरूप पोहोचवणाऱ्या एसटीत प्रवास करतात. असे ही प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी यावेळी सांगीतले.
माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी आपल्या लोकप्रिय आवडत्या लालपरी एसटी बसच्या ७१ वर्षापुर्वीच्या प्रवासावर उजळ टाकताना अनेक विषयांची माहीती देतांना सांगीतले की, ७१वर्षात एसटीमुळेच आपल्या राज्यातील कोणत्याही शहरी भाग किंवा ग्रामीण असो यासाठी वेग-वेगळ्या भागात रस्त्यांचे जाळे वणले गेले आहे. त्यात एसटीचा फार मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगीतले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलचे प्रभारी आगार व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार जितेन्द्र कुंवर, पोलीस निरिक्षक डी. के. परदेशी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले, आगाराच गोविंदा जंजाळ, संजय मोरे, जे. एम. कुरनभट्टी, के. बी. तडवी, संदीप अडकमोल, आर .के. बारी जंजाळ, आधी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार आगाराचे लिपीक अतुल चौधरी यांनी केले.