भरधाव बसची कारला धडक; दोन महिला जागीच ठार

अहिल्यानगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नगर- कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे भरधाव बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आळेफाट्यावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. ही धडक इतकी होती की, दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रिया गायकर आणि कुसुम शिंगोटे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलांचे नाव आहे. या दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी आहेत. तर, काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी ओतूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Protected Content