मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील महिला आणि बालविकास विभागातंर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे. त्यांचा कार्यकाळ २२ ऑक्टोबरला संपणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा त्यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले आहे. याबाबत गॅजेद प्रसिध्द करण्यात आले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षाचा असतो. सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर अध्यक्षा आहेत. आता त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे. रूपाली चाकणकर यांना विधानपरिषदेचा आमदार केले जाईल, अशी चर्चा होती. परंतू अनेक महिला नेत्यांचा त्यांच्या नावाचा विरोध होता. म्हणून आता त्यांना पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता हे पद पुढील तीन वर्षे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे.