Home क्राईम आरटीओ कार्यालयाची फसवणूक; बनावट कागदपत्रांद्वारे वाहनाचे हस्तांतरण

आरटीओ कार्यालयाची फसवणूक; बनावट कागदपत्रांद्वारे वाहनाचे हस्तांतरण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनाचे बेकायदेशीर हस्तांतरण करून शासनाची आणि मूळ मालकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रमानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक शिवाजीराव ठाकरे (वय ४६, रा. नवनाथ नगर, जळगाव) यांनी ही फिर्याद दिली आहे. जळगाव आरटीओ कार्यालयामध्ये वाहन क्रमांक (MH 19 EJ 8055) च्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार घडला. संशयित आरोपींनी वाहन मालकाचे बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड तयार केले. इतकेच नाही तर, आरटीओ कार्यालयासमोर एक ‘डमी’ व्यक्ती उभी करून, तीच मूळ मालक असल्याचे भासवले. या डमी व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या घेऊन आणि वरिष्ठ लिपिकांकडून त्या साक्षांकित करून घेत सदर वाहनाचे परस्पर हस्तांतरण करण्यात आले.

या फसवणुकीमध्ये केवळ बनावट ओळखपत्रांचाच वापर झाला नाही, तर ऑनलाइन प्रणालीमध्ये मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे आणि बनावट ‘बँक ना-हरकत प्रमाणपत्र’ तयार करण्याचे धाडस देखील आरोपींनी केले आहे. या गुन्ह्यात शिवलाल ब्रिजलाल पाटील (रा. मुक्ताईनगर), अक्षय सोनवणे (रा. जळगाव) आणि एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. पोलीस कारवाई या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound