Home Cities जळगाव रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या ‘सेवालय’चा उद्या चौथा वर्धापन दिन

रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या ‘सेवालय’चा उद्या चौथा वर्धापन दिन


जळगाव (प्रतिनिधी)। रा.स्व.संघाच्या जनकल्याण समितीच्या जळगाव शाखेतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयात चालविण्यात येणार्‍या ‘सेवालय’चा चौथा वर्धापन दिन सोमवार (दि. 4) रोजी संध्याकाळी ५.३० वाजता व.वा.वाचनालय सभागृह, स्टेशन रोड येथे आयोजित करण्यात येणार आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुमतीलाल टाटिया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या संस्थापिका सविताताई कुळकर्णी प्रमुख वक्त्या असतील. यावेळी काही सेवाभावी कार्यकर्त्यांचा गौरवही करण्यात येणार आहे.

जनकल्याण समितीतर्फे ‘सेवालय’प्रमाणेच अन्नपूर्णा योजना, ४२ गावांमध्ये आरोग्यरक्षक योजना, सेवावस्तीत दवाखाना, रुग्णोपयोगी साहित्य वितरण, संस्कार वर्ग, अभ्यासिका तसेच रुग्णमित्र आदी प्रकल्प आणि उपक्रमही चालविले जातात. कार्यक्रमाला सर्व नागरिक बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनकल्याण समितीचे अध्यक्ष मनीष काबरा आणि कार्यवाह विनोद कोळी यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound