मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सरकारच्या 50-50 वाटपाला शिवसेना आणि भाजपमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. परंतू सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्रात मार्ग काढावा, असे आवाहन शिवसेनेच्या एका नेत्याने पत्र लिहून केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जवळिक मानले जाणारे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाला हे पत्र पाठवले आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्रातून तिवारी म्हणाले, राज्याच्या जनतेने भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला आहे. परंतु, भाजप युतीधर्म पाळत नाही. त्यामुळेच, सरकार स्थापनेला राज्यात विलंब होत आहे. अशात आरएसएसने दाखल देऊन यावर तोडगा काढावा. यावर संघाने काय प्रतिक्रिया दिली हे अद्याप समोर आले नाही.