Home क्राईम आरपीएफ जवानाचे बंद घर फोडून ५६ हजारांचा ऐवज लांबविला !

आरपीएफ जवानाचे बंद घर फोडून ५६ हजारांचा ऐवज लांबविला !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, रेल्वे स्टेशन परिसरातील गजबजलेल्या भागात एका आरपीएफ (RPF) जवानाचे घर फोडून चोरट्यांनी ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ९ मार्च रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:४५ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर संजय पाटील (वय ३३) हे चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर आरपीएफमध्ये कार्यरत आहेत. ते ग.स. सोसायटीजवळ, ब्रिज कॉर्नर हॉटेलच्या पाठीमागे भाड्याच्या घरात राहतात. ९ मार्च रोजी सकाळी ते कर्तव्यावर गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला. यामध्ये ३३ हजार रुपये किमतीची सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली, त्यानुसार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी शंकर जंजाळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound