रावेर (प्रतिनिधी) रमजान ईदच्या पूर्व संध्येला शहरात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. उद्या (दि.५) रोजी रमजान ईद आहे, त्यामुळे कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलिस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील व श्री. शेख यांच्या नेतृत्वाखाली शहरातून रूटमार्च काढण्यात आला.
रावेर शहरातील मेन रोड, चावडी भाग, नागझिरी भाग, प्रताप व्यायाम शाळा, शिवाजी व्यायाम शाळा, भोई वाडा, अंबिका व्यायाम शाळा आदी ठिकाणांवरुन पोलिसांनी रुट मार्च केला. यावेळी मोठ्या संखने पोलिस, एसआरपी व होमगार्ड सहभागी झाले होते.