बहिणाबाई कोविड केअर सेंटरला रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे डॉ.अपर्णा भट यांची भेट

 

जळगाव, प्रतिनिधी। लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शासकीय तंत्र निकेतनच्या मुलींचे वसतीगृह येथे सुरू झालेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरला आज रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या अध्यक्षा तथा कलासक्त व्यक्तिमत्त्व डॉ.अपर्णा भट ( कासार ) यांनी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, समाजातील दानशूरांकडून मदतीचा ओघ सुरुच असून ओम बिल्डक्वानचे निर्णय अरविंद चौधरी यांच्याकडून रुपये २५ हजाराचा धनादेश तसेच डॉ. अनिल पाटील यांच्यातर्फे ११,000 चा धनादेश सचिन धांडे , चंदन कोल्हे आणि पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

 डॉ. भट ( कासार ) यांनी डॉक्टरांशी संवाद साधला आणि समाधान व्यक्त केले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तसेच बहिणाबाई कोविड केअर सेंटरच्या पदाधिकारी प्रतिभा शिंदे आणि केअर सेंटरचे पदाधिकारी, चंदन कोल्हे , सचिन धांडे , चंदन अत्तरदे , अभिजित महाजन, भरत कर्डिले , तुषार वाघुळदे , राजेश पाटील ,संदीप पाटील , ऍड. पुष्कर नेहते , भूषण बढे ,किरण वाघ ,प्रमोद पाटील ,पराग महाजन आदींचे कौतुक केले. सचिन धांडे व चंदन कोल्हे यांच्याशी डॉ. अपर्णाजी यांनी चर्चा केली आणि कोविड सेंटरचे विविध विभाग , किचन रूम आदींची पाहणी केली.

Protected Content