खामगाव प्रतिनिधी (अमोल सराफ) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरॅक्ट क्लबच्या वतीने ‘मास्क बिना प्रवेश नाही’ असे डिजिटल सुचना फलक लावण्यात आले आहे. या मोहिमेतंर्गत आतापर्यंत १ हजार फलक लागले.
कोरोनाच्या महामारीने अवघे जग हैराण झाले आहे. कोरोनावर अध्याप कुठल्या औषध तयार झाले नसल्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे आहे. ते म्हणजे मास्कचा वापर करणे. मास्क वापर केल्याने त्याचा प्रसार रोखण्यास मदत होते असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळेच शासनाकडूनही मास्क वापरणे बंधनकारक केले असून याकरिता दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे.
मात्र तरी देखील अनेक नागरिकांनामध्ये याबाबत गंभीर्य दिसत नसून बरेच जण मास्क न लावता सर्वत्र वावरत असतात. नागरिकांनी मास्कचा वापर केला पाहिजे. याकरिता शासन प्रशासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात असून या जनहिताच्या कार्यात सहभाग घेत खामगाव रोटरॅक्ट क्लबने एक प्रभावी मोहीम हाती घेतली आहे. रोटरॅक्ट क्लबने सुरुवातीला मास्क प्रवेश नाही असे 900 सूचनाफलक तयार करून शहरात वेगवेगळ्या दुकानात प्रवेश द्वारावर लावले त्यांचा या उपक्रमाला काही दानशूरांनी हातभार लावत आर्थिक मदत केली.
अशा ठिकाणी लावले फलक
यातून क्लबने आणखी शंभर डिजिटल फलक छापून घेतले व शहरातील विविध दुकाने, शासकीय, निमशासकीय कार्यालय, पोलिस स्टेशन आदी ठिकाणी सूचना फलक लावले. याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळत असून दुकानात प्रवेश करताना नागरिक मास्क लावत असल्याचे दिसून येत आहेत. आज खामगावातील वीज वितरण कंपनीत कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायेभाय, अभियंता दिलीप वक्ते, आनंद देव व मनीष कदम यांच्या उपस्थितीत आज रोटरॅकट क्लब च्या वतीने सदर उपक्रम पार पडला रोटरॅकट क्लबचे अध्यक्ष सचिन पूरवार, प्रकल्पप्रमुख कृष्णा अग्रवाल, सचिव अजित घवाळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. हा उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस अध्यक्ष सचिन पूरवार यांनी व्यक्त केला असून कुणास अशी सूचना फलक असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.