बोदवड(प्रतिनिधी) येथील पोलीस स्टेशनतर्फे जामा मस्जिद परिसरात नुकतेच पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील उपनिरीक्षक दीपक ढोमणे, तहसीलदार रवींद्र जोगी, गटनेते कैलास चौधरी, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, मुख्य अभियंता दीपक राठोड, नगरसेवक कैलास माळी, प.स.सदस्य गणेश पाटील, सईद बागवान, युनूस बागवान, योगेश कोलते, मधुकर राणे, यांच्यासह सर्व स्तरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या कर्मचऱ्यांनी परिश्रम घेतले.
आपल्या मनोगतात आ. खडसे यांनी रमजान हा पवित्र सण असुन दरवर्षी मी न चुकता मुस्लीम बांधवांसोबत रमजान साजरा करतो, हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक असणारा हा सण आहे.