चाळीसगाव प्रतिनिधी । खडकी बु दुवामहल परिसरातील मशिदमध्ये सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ ठुबे आयोजित पवित्र रमजान रोजा इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आले.
यावेळी युवा नेते सचिन भाऊ ठुबे, महादू पागे, उपसरपंच मुश्ताक खाटीक, सुजित गायकवाड, बापूराव मांडोळे, अर्जुन पवार, मनाजी तांबे, विनायकराव मांडोळे, नाना तांबे, मुराद पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. सचिन ठुबे यांनी खडकी पाटखडकी सब स्टेशन दुवामहल परिसरात नेहमी हिंदू मुस्लिम एकता अबाधीत ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम करत असतात .ते दरवर्षी पवित्र रमजान रोजा इफ्तार पार्टी व रमजान ईदला मुस्लिम समाजातील बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हजर असतात. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक उपसरपंच मुसताक खाटीक यांनी केले. तर आभार मुराद पटेल यांनी मानले.