भुसावळ प्रतिनिधी । येथील मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांची बीड येथे बदली झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत वृत्त असे की, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांची बीड येथे बदली झाल्याचे वृत्त आहे. याबाबत दोरकुळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते कामानिमित्त दिल्ली येथे गेले असल्याचे कळले. मात्र त्यांनी आपली बदली झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांना बदलीचे पत्रदेखील प्राप्त झाले आहे.