जळगाव (प्रतिनिधी) रूबी हॉस्पिटल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. 12 मे रोजी दुपारच्या सुमारास ही चोरी झाली होती. या संदर्भात आज जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी कि, रमेश सखाराम महाजन (वय 36 रा. आयोध्या नगर, स्वीट होम कॉलनी) हे बाफना शोरूममध्ये कॅन्टीनमध्ये कामाला आहे. श्री.महाजन यांच्या वहिनी रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे. पत्नी माहेरी गेल्यामुळे श्री. महाजन हे आईला जेवणाचा डबा देण्यासाठी रुबी हॉस्पिटलला 12 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोहचले. त्यांनी हॉस्पिटलसमोर आपली दुचाकी क्रमांक (एमएच 18 x 9841) लावली त्यानंतर ते अडीच वाजता खाली उतरले. त्यावेळी त्यांना पार्किंग केलेल्या ठिकाणी आपली दुचाकी गाडी मिळून न आल्याने शोधाशोध सुरू केली. परंतू ती कुठेही दिसून नाही. अखेर या संदर्भात आज जिल्हापेठ पोलिसात दुचाकी हरवल्या बाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.