प्रसिध्द अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या घरावर दरोडा

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आला आहे. सातारा शहरातील पिरवाडी परिसरामध्ये श्वेता शिंदेचे घर आहे. श्वेता शिंदे आपल्या आईसोबत एकटीच राहते. पण सिनेमाच्या चित्रिकरणानिमित्त ती मुंबईमध्ये आली होती. याचदरम्यान साताऱ्यातील घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून १० तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

चोरट्यांनी श्वेताच्या घरातील कपाट जाळले आणि यानंतर त्यातील दागिने लंपास केले. ३ जून रोजी रात्री माझ्या साताऱ्याच्या घरावर दरोडा पडला. साधारणतः दहा तोळे सोने आणि काही रोखरक्कम देखील चोरीला गेली आहे. दरोडा पडला त्यावेळेस सुदैवाने आई घरामध्ये नव्हती. पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे, ते या प्रकरणाचा छडा लवकर लावतील”,अशी प्रतिक्रिया अभिनेत्री श्वेता शिंदेने दिली आहे.

Protected Content