जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात पुतणी सोबत पायी जाणाऱ्या प्रौढाच्या खिश्यातील रोख रक्कम दोघांनी जबरी हिसकावून शिवीगाळ करून पसार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिलीप भीमराव जाधव (वय-४७) रा. मिलींद नगर, मालेगाव रोड चाळीसगाव हे पुतणी सोनी सुरेश इंगळे यांच्यासह शहरातील गेंदालाल मिली परिसरातून शुक्रवार २ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पायी जात होते. त्याचवेळी मुसेफ मुलतानी रा. गेंदालाल मिल आणि एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येवून दिलीप जाधव यांच्या शर्टाच्या खिश्यातील १ हजार २०० रूपये जबरी काढून घेतले. याचा जाब पुतणी सोनी यांनी विचारला असता दोघांनी मुलीला शिवीगाळ करून घटनास्थळहून पसार झाले. काका पुतणी दोघांनी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द तक्रार दिली. दिलीप जाधव यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अक्रम शेख करीत आहे.