पाचोर्‍यात रोड रोमियोंचा धुमाकूळ : बंदोबस्त करण्याची मनसेची मागणी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरात रोड रोडिओंचा धुमाकूळ सुरू असून पोलीस प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

 

पाचोरा येथील अल्पवयीन युतीवर सीड फेकण्याची धमकी देत विनयभंग केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच समोर आली आहे. पाचोरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या निंदनीय घटनेचा आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणातील संशयीतांवर कठोर कारवाई व्हावी तसेच पाचोरा शहरात ठिकठिकाणी रोड रोमीओंचा वाढता उच्छांद आटोक्यात आणण्यास प्रयत्न व्हावा. यासाठी पाचोरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

सदरचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी स्विकारले. निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष शुभम पाटील, पाचोरा शहराध्यक्ष  ऋषिकेश भोई, शेतकरी सेनेचे ज्ञानेश्वर ठाकरे, तालुका संघटक जितू नाईक, सरचिटणीस कृष्णा दूंदुले, संघटक निलेश मराठे, उपाध्यक्ष यश रोकडे, प्रशांत पाटील, सागर वाघ यांचेसह पाचोरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पाचोरा शहरात रोड रोमियोंचा धुमाकुळ जास्त वाढलेला दिसत आहे. २७ जुलै रोजी पाचोरा शहरात मध्ये एका तरुणानी माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या अंगावर अँसिड फेकेल अशी धमकी १४ वर्षीय मुलीला दिली. त्यावर पोलिस प्रशासाने गुन्हा दाखल करून कारवाई देखील करण्यात आली आहे. परंतु पाचोरा शहरामध्ये शाळा, कॉलेज, क्लासेससाठी पाचोरा तालुक्यातून खूप मुल – मुली शहरात येतात त्यांना देखील रोड रोमियो छेडत असतात. पण ते घरी सांगू शकत नाही कारण की, त्यांची शाळा, कॉलेज घरचे बंद करतील आणि त्यांचे शिक्षण बंद होईल असे मनसेच्या निवेदनात म्हटले आहे.

 

या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, मुलगी ही कोणत्याही समाजाची असो हिंदू किंवा मुस्लीम समाजाची असो आम्ही जातीय भेदभाव मानत नाही प्रत्येक मुलगी कोणाची तरी बहीण असते त्याचे स्वरक्षण करणे है भावांचे कर्तव्य आहे. पोलिस प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे विनंती आहे की आपण पाचोरा तालुक्यात एक दामिनी पथक तयार करावे जेणे करून ते पथक सर्व शाळा / कॉलेज ला दोघी वेळी गस्त मारेल व बस स्टँड परिसरात कायमस्वरूपी एक पोलीस कर्मचारी नेमणूक करावा जने करून रोड रोमियोंना पोलिस प्रशासनाचा धाक निर्माण होईल व यापुढे अशी काही घटना घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलायला हवी असे न झाल्यास महारष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा मुलींसाठी स्वतंत्र हेल्प लाईन नंबर सुरू करेल व कोणत्याही बहिणीची तक्रार आल्यास समोरचा कोणत्याही धर्माचा असो त्याला मनसे स्टाईल ने चौकात आणून चोप दिला जाईल असे निवेदनात  महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा तर्फे  म्हटले आहे.

Protected Content