रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील जूना सावदा रोडवरील नागझरी पुलाचे काम ४ महिन्यांपासून सुरु आहे. वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफार्मरमुळे या कामात अडथळा येत आहे, यामुळे नाल्याचे पाणी काढण्यास व्यत्यय येत आहे. पालीकेने नाला सफाई केल्यामुळे तात्पुरता केलेला पर्यायी रस्ता बंद झाला. या नाल्यावर पर्यायी रस्ता व्हावा यासाठी शेतकरी संघर्ष समिती तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील रेल्वे स्थानक रोडवर समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रावेर शहरातील जूना सावदा रोडवरील नागझरी पुलाचे काम ४ महिन्यांपासून सुरु आहे. वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफार्मरमुळे या कामात अडथळा येत आहे, यामुळे नाल्याचे पाणी काढण्यास व्यत्यय येत आहे. त्यामुळे नागरिक, शाळेतील विद्यार्थ्यांना दोन-आडीच किलोमीटर अधिक अंतर फिरून जावे लागत आहे. यासाठी शेतकरी संघर्ष समिती तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
यावेळी डीडी वाणी, ॲड. योगेश गजरे, ॲड. जे. जे. पाटील, विनोद तायडे, शेखर हंसकर, मुबारक तडवी, राजेंद्र चौधरी, घनश्याम पाटील, प्रशांत पाटील, संदीप महाजन, रविंद्र पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक रास्तारोकोमध्ये सहभागी झाले. यावेळी ठेकेदार राजेंद्र चौधरी यांनी आंदोलनकर्त्या नागरिकांना पर्यायी रस्ता लवकर तयार करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.