जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात दुचाकी वाहनाला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून ध्वनी प्रदुषण करणाऱ्या १७ बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई करून सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. आज ३ एप्रिल रोजी १७ सायलेन्सर वाहतूक शाखेच्या आवारात रोड रोलरच्या मदतीने चुराडा केला आहे.
जळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून शहरातील टॉवरचौक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौक परिसरात काही टवाळखोर बुलेटधारक वाहनाला वेगवेगळे कर्कश करणारे प्रेशर हार्न लावून शांतता भंग केला जात होता. पोलीस निरीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सुचनेनुसार अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास शहर वाहतूक शाखेने गेल्या महिन्यापासुन सुरूवात केली होती. यात एकुण १७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून २२ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. व सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. आज ३ एप्रिल रोजी जप्त केलेले १७ सायलेन्सरवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने रोड रोलर फिरवून चुराडा केला आहे.
दरम्यान, ज्या वाहनधारकांनी अश्या आवाज करणारे सायलेन्सर लावले असतील तर त्यांनी काढून घ्यावेत, शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार असून अशा प्रकारची वाहने आढळून आल्यास त्यांना जप्त करण्यात येवून परवाना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांनी सांगितले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1932981730205076