चोपडा प्रतिनिधी । काँग्रेस सदस्या प्रियांका गांधी यांना अटक केल्याचे पडसाद चोपड्यात देखील उमटले असून आज येथे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दक्षिण गेट जवळ हॉटेल योगी समोर चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना योगी सरकारने त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले. या अटकेच्या निषेधार्थ ,त्याच प्रमाणे लखीमपुर येथे अमानुषपणे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ चोपडा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील यांचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले .आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के. डी. चौधरी, उपाध्यक्ष सय्यद, प्रदीप पाटील, ॲड. एस.डी. पाटील नंदकिशोर सांगोरे, राजेंद्र पाटील, कांतीलाल सनेर, किरण सोनवणे, चेतन बाविस्कर ,मधुकर बाविस्कर, तात्यासाहेब शिंदे ,रमाकांत सोनवणे, इलियास पटेल ,देवकांत चौधरी, प्राध्यापक शैलेश वाघ ,प्राध्यापक संदीप पाटील ,मुक्तार सय्यद ,रोहन पाटील, अशोक साळुंखे, देवानंद शिंदे, अरिफ शेख, प्रदीप चौधरी, धनंजय पाटील, सोहन सोनवणे, डॉ.अशोक कदम, प्रमोद पाटील, भिका पाटील, शशिकांत साळुंखे, एकनाथ शिंदे चौधरी आधी अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला यावेळी बेकायदेशीररित्या प्रियंका गांधी यांना अटक करणाऱ्या योगी सरकारचा धिक्कार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्षअसल्याचा ॲड. संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.