मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अंधेरी येथील पोटनिवडणुकीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झाला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक झाली होती. यात भाजपने उमेदवार न दिल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे मानले जात होते. आणि झालेदेखील तसेच. मात्र या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यात दुसर्या क्रमांकावर नोटा हा पर्याय राहिला. कदाचित हे देशातील या स्वरूपाचा हा देशातील पहिलाच प्रसंग असावा.
आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. पंधराव्या फेरीच्या अखेर ऋतुजा लटके यांना ५५९४६ मते मिळाली. तर तब्बल १०९०६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. दरम्यान, पुढीलप्रमाणे उर्वरित उमेदवारांना मते मिळाली. बाळा नाडार -१२८६; मनोज नाईक – ७८५; मीना खेडेकर – १२७६; फरहान सय्यद – ९३२; मिलिंद कांबळे – ५४६; राजेश त्रिपाठी – १३३०.
दरम्यान, या माध्यमातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभेत आपले खाते उघडले आहे.