जळगांव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदार संघातील नशिराबाद येथे रिपाइंच्या (आठवले गट) महिलांचा एक मेळावा आज (दि.१५) घेण्यात आला.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या कार्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख आनंद बाविस्कर यांचे हात बळकट करण्यासाठी विविध जाती-धर्माच्या महिलांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यावर विश्वास दाखवत या मेळाव्याचे आयोजन केले होते.
मेळव्याला महिलांची मोठी गर्दी झाली होती तर खऱ्या अर्थाने रिपाइं एकच पक्ष नि:स्वार्थपणे लोकांच्या समस्या सोडवत असल्याचे मत यावेळी महिलांनी व्यक्त केले. मेळाव्यात आनंद बाविस्कर यांनी रोजगार विषयावर मार्गदर्शन केले. नवनवीन उद्योग व्यवसाय स्वत:चे व्यवसाय लघु उद्योग यासह विविध राज्य शासन केंद्र शासन योजनांची माहिती त्यांनी दिली. नशिराबाद येथील मेळव्याला आलेल्या महिला संख्या सुमारे एक हजार होती.
महिला जिल्हा प्रमुख श्रीमती नंदाताई बाविस्कर,जिल्हा कार्यध्यक्षा श्रीमती चारुलता ताई सोनवणे, जिल्हा सरचिटणीस श्रीमती मिनाक्षीताई पाटील, युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे, जळगांव तालुकाध्यक्ष श्रीमती रमाताई ढिवरे, महिला महानगर प्रमुख श्रीमती प्रतिभाताई भालेराव, पाध्यक्ष श्रीमती पुनमताई नाथ, महानगर संपर्कप्रमुख श्रीमती गिताताई वाघ, कल्पना महाजन, लता जैन, पुष्पलता कुलकर्णी, रजिया शेख, गीता तायड़े, अर्चना वाघ यांच्यासह
मोठ्या संख्येने महिला व मूली उपस्थितीत होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गीता वाघ यांनी केले तर आभार रजिया शेख यांनी मानले.